प्रियकराने लग्नास नकार दिल्याने परप्रांतीय नर्सची आत्महत्या

नाशिक: पोलीसनामा ऑनलाईन 

नाशिक : प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने परप्रांतीय नर्सने गळफास घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आश्विनी के.के. (वय 25) रा. अपोलो हाॅस्पिटल, नर्सिंग होस्टेल,रुम नंबर 4, पहिला मजला, नाशिक मुळ राकेरळ असे आत्महत्या केलेल्या नर्सचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्स अश्विनी यांचे काही महिन्यांपासून एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रियकराने अचानक लग्नास नकार दिल्याने गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास आश्विनी या नर्सने हाॅस्टेलच्या रुममध्ये नायलाॅन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़