फुरसुंगी कमान ते गाडीतळ हडपसरकडे जाणाऱ्या रोडवर तात्पुरत्या स्वरुपात नो पार्किंग

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

हडपसर वाहतूक विभाग पुणे अंतर्गत येणाऱ्या फुरसुंगी कमान येथून सासवडकडे आणि गाडीतळापासून हडपसरकडे जाणाऱ्या दिशेला शंभर मीटर अंतरापर्यंत तसेच फुरसुंगी गावाकडे जाणाऱ्या रोडवर पन्नास मीटर अंतरा पर्यंत प्रायोगिक तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नो पार्किंग झोन करण्यात आल्याची माहिती पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली आहे.

नागरिकांना याबाबत काही सुचना असतील तर त्यांनी पोलीस उपायुक्त, नियंत्रण शाखा , साधु वासवानी रोड, पुणे-1 या ठिकाणी दिनांक 20.3.2018 ते 03.04.2018 या कालावधीत लेखी स्वरुपात कळवाव्यात असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.नागरीकांच्या सुचना हरकती यांचा विचार करुन आत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता आदेश काढण्यात येणार आहे.