फेक न्यूज दिल्यास पत्रकाराची मान्यता होणार रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे फेक बातम्यांच्या आलेख ही वाढत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा  फेक बातम्यांच्या  आलेख पाहता कठोर पावले उचलली जाणार आहे. फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

पहिल्यांदा फेक न्यूज दिल्यास सहा महिन्यांसाठी, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास एका वर्षासाठी, तर तिसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन केल्यानंतर पत्रकाराची कायमस्वरुपी मान्यताच रद्द केली जाणार आहे. फेक न्यूजची व्याख्या मात्र माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्पष्ट केली नसली तरी विभागातील मार्गदर्शक तत्त्वांमध्येही तसा बदल करण्यात आला आहे. माहिती व प्रसारण खात्याने जाहीर केलेल्या पत्रकानुसार प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया आणि न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन या नियामक संस्थांना फेक न्यूज म्हणजेच खोटी बातमी कोणती हे ठरवण्याचे अधिकार देण्यात आले आहे. फेक न्यूजसंदर्भात या यंत्रणांकडे तक्रार दाखल केल्यावर अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची नोंदणी चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केली जाईल. १५ दिवसांमध्ये ही चौकशी पूर्ण करावी, असं या पत्रकात म्हटले आहे.