बदलीसाठी राजकीय शिफारसी आणणाऱ्या 42 पोलिसांवर कारवाईची शक्यता

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन

बदलीसाठी राजकीय शिफारस करने आता पोलिस अधिकाऱ्यांच्या अंगलट येण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. गृह खात्याने शिफारसी आणणाऱ्या 42 पोलिस निरीक्षकांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.

राज्यातील पोलिस निरीक्षकांनी अनेक आमदार, मंत्री तसेच इतर राजकीय नेत्यांचं शिफारसपत्र बदलीसाठी जोडलं होतं. या संदर्भातील लेखी खुलासा आता घेतल्यानंतर त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. गृह खात्याने राजकीय व्यक्तीकडून शिफारस आणणाऱ्या 42 पोलिस अधिकाऱ्यांची नावं दिली असून त्यांच्याकडून लेखी खुलासा घेतला जाणार आहे.
पोलिसांना बदलीचं शिफारसपत्र देणाऱ्यांमध्ये मंत्री गिरीष बापट, विनोद तावडे,चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक आमदार आणि राजकीय नेत्यांची नावे यात समाविष्ट आहेत.

महत्वाचे : मुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळातील वजनदार मंत्री आपल्या भागात हव्या त्या तसेच मर्जीतील पोलीस आधिकाऱ्यांच्या नेमणुका करून घेतात. त्याच प्रमाणे विरोधी पक्षातील आमदार देखील त्यांना हव्या त्या आधिकाऱ्यांची नेमणूक व्हावी म्हणून शिफारसपत्र देतात. पोलिसांनी नेमणुकीसाठी शिफारसपत्र घेतले तर त्यात गैर ते काय.