बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतला एमबीबीएसला प्रवेश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

एमबीबीएस या वैद्यकीय प्रवेशासाठी बनावट कागदपत्र सदार करणा-या विद्यार्थ्याविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवेश मिळवण्यासाठी नागपूरच्या उपजिल्हाधीकारी यांच्या कार्यालयातून बनावट जात प्रमाणपत्र तयार करुन ते कॉलेमध्ये सादर केले होते. हा प्रकार पिंपरी येथील डीवायपाटील इन्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅंड रिसर्च कॉलेजमध्ये उघडकीस आला.

कार्तीक राजु श्रीवास (वय-21 रा. संत तुकारामनगर, मुळ रा. नागपुर) असे बनावट कागदपत्र सादर करणा-या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी डॉ. राकेश उषाकांत ढोलकीया (वय-59, रा. बावधन) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीवास याने पिंपरी येथील डी. वाय. पाटील इन्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅंड रिसर्च कॉलेजमध्ये २०१७-१८या शैक्षणीक वर्षासाठी एमबीबीएसच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला. शासनाच्या राखीव जागेसाठी प्रवेश मिळवण्यासाठी त्याने नागरपूच्या उपजिल्हाधीकारी कार्य़ालयातून बनावट जात प्रमाणपत्र तयार करुन घेतले. हे प्रमाणपत्र त्याने कॉलेज प्रशासनाला सादर केले. त्याची जात पडताळणी करण्यात आली त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. कार्तीक याने कॉलेज आणि महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कडाळे तपास करीत आहेत.