बळजबरी शारीरिक अाणि अनैतिक संबंध ठेवल्यास मिळु शकतो तलाक : उच्च न्यायालय

चंदीगड: वृत्तसेवा

महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांना नेहमीच तोंड द्यावे लागते आहे. यामध्ये थोडासा दिलासा म्हणुन उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे. यात असं म्हटलं आहे की, बळजबरीने शारीरिक तसेच अनैतिक संबंध ठेवल्यास त्याचा आधार घेऊन तलाक मिळू शकतो.असे एका महिलेच्या याचिकेवर सुनावनी दरम्यान उच्च न्यायालयाने सांंगितले आहे.

यापुर्वी या महिलेने याचिकेव्दारे तलाक मागितला होता. मात्र कनिष्ठ न्यायालयाने या महिलेच्या मागण्या अमान्य करुन त्या फेटाळण्यात आल्या. मात्र तब्बल चार वर्षांनी उच्च न्यायालयाने यावर फेरविचार करुन या महिलेची मागणी मान्य करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने आपले मत व्यक्त केले आहे.

येथिल एका उच्चशिक्षित तरुणीचं बिहारमधील तरुणाशी २०१७ मध्ये लग्न झाले होतं. त्यांना एक मुलगाही आहे. या महीलेच्या मते, लग्नादरम्यान हुंडा देण्यात आला होता. त्यावेळी मुलगा इंजिनीअर असल्याचे त्याच्या घरच्यांनी सांगितले होते. मात्र लग्नानंतर पती मारहान करत होता. तसेच अनैसर्गिक संबंध ठेवत होता.असे आरोप या महिलेने केले होते. त्यावर या महिलेचे आराेप गंभीर आहेत. असे न्यायालयाने सुनावनी दरम्यान सांगितले. पुढे अशा प्रकरणांत कधी-कधी याचिकाकर्त्याचा दावा चुकीच्या पध्दतीने फेटाळला जातो, असं अनेकदा आढळून आलं आहे. बळजबरी शारीरिक संबंध अथवा अनैसर्गिक संबंधांसाठी पती-पत्नीवर दबाव आणला जातो. त्यामुळे संबंधितांना असह्य वेदना होतात. त्यामुळंच पती-पत्नीमधील नातं संपुष्टात येऊ शकतं किंवा त्या आधारांवर तलाक मिळू शकतो, असं न्यायालयानं म्हटलं आहे.