बालगंधर्व रंगमंदिर पडण्यास आमचा विरोध,बालगंधर्व संगीत रसिक मंडळाची भूमिका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन 

नटसम्राट बालगंधर्व यांच्या हस्ते या बालगंधर्व रंगमंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते. तर पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेमधून भव्य अशी वास्तू साकारण्यात आली असून सद्य स्थितीला ही ऐतिहासिक वास्तू पाडण्याच्या निर्णयाला आमचा विरोध असणार आहे.अशी भूमिका बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.यावेळी बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी हे देखील उपस्थित होते.

यावेळी सुरेश साखवळकर म्हणाले की, बालगंधर्व रंगमंदिराच्या मुळ वास्तूला कोणत्याही प्रकारचा हात न लावता. त्याच्या बाजूने कॉलम उभारण्यात यावेत.तसेच नवीन बांधकाम करावे किंवा बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरातील मोकळ्या जागेवर बांधकाम करावे.जर ही वास्तू पाडण्याच्या भूमिकेवर हे ठाम असल्यास आमचा तीव्र विरोध राहणार आहे.त्याच बरोबर या विरोधात आम्ही लढा उभारू असा इशारा त्यांनी दिला आहे.