बिग बॉसच्या घरात वातावरण तापले; आस्ताद मेघावर भडकला…

मुंबई : वृत्तसंस्था

हिंदीनंतर मराठीत सुरु झालेल्या बिग बॉस मालिकेत अवघ्या चार दिवसांत बिग बॉस च्या घरात चांगलेच वातावरण तापले आहे. नॉमिनेट सदस्यांसाठी ‘प्रार्थना यज्ञ’ या टास्कची घोषणा बिग बॉसने केली होती. यानंतर हा पहिला टास्क करताना घरातील मंडळीची चांगलीच तारांबळ उडाली. आस्ताद काळेनं त्याच्या सहकाऱ्यांसोबत हा टास्क यशस्वी करून दाखवला.

अवघ्या चार दिवसांत बिग बॉसच्या घरातील वातावरण तापल्याचे दिसून येतंय. नॉमिनेट सदस्यांसाठी ‘प्रार्थना यज्ञ’ या टास्कची घोषणा बिग बॉसने केली होती. यानंतर हा पहिला टास्क करताना घरातील मंडळीची चांगलीच तारांबळ उडाली. आस्ताद काळेनं त्याच्या सहकाऱ्यांसोबत हा टास्क यशस्वी करून दाखवला.

दरम्यान ,बिग बॉसच्या घरामध्ये विनीत भोंडे हा पहिला कॅप्टन होता. पण आता एक आठवड्याचा कालावधी संपला असून घराचा दुसरा कॅप्टन निवडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे बिग बॉस घरामधील सर्व सदस्यांना एकत्र बोलावून आता नवीन कॅप्टनची घोषणा करणार आहे आणि कॅप्टन निवडण्याची प्रक्रियादेखील सांगणार आहेत. या आठवड्यात झालेल्या प्रार्थना यज्ञ आणि ईतर टीम टास्क मध्ये ज्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले त्यांना कॅप्टन बनण्याची संधी देण्यात येणार आहेत.