बिटकॉईनच्या माध्यमातून करोडो रुपयांचा गंडा घालणारा मुख्य सुत्रधार गजाआड

मुख्य सुत्रधारासह सातजण अटकेत

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन

बिटकॉईनच्या माध्यामातून करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या मुख्य सुत्रधारांना पुणे सायबर क्राईम सेलच्या विशेष पथकाने दिल्ली येथून अटक केली आहे. त्यांना कोर्टामध्ये हजर केले असता 13 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अमित महेंदरकुमार भारद्वाज (वय-35, रा. 44 ए, शाहीपुर व्हिलेज, शालीमार बाग, नवी दिल्ली-88) व विवेककुमार महेंदरकुमार भारद्वाज (वय-31, रा.सदर) हे दोघेही गेन बिटकॉईन , जीबी मायनर्स व जीबी 21 या कंपनीचे सीईओ अॅण्ड फाऊंडर गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आहेत. अटक केलेले दोघे भाऊ जी.बी.21 गेन बिटकॉईन नावाची कंपनी सिंगापूर या ठिकाणावरुन चालवत होते. तसेच स्थापन करण्यात आलेल्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वडिलांची नेमणुक केली होती. एकंदर नागरिकांना मोठ्या परताव्याचे अमिष दाखवत ही फसवणुक केल्याचे समोर आले आहे. महेंदरसींग भारद्वाज, अमीत भारद्वाज, अजित भारद्वाज, विवेककुमार भारद्वाज, आशिष दबास, मनु शर्मा, रुपेशसींग हे आरोपी गेट बिटकॉईन या अभासी कंपनीत कार्यरत होते. सेव्हन स्टार या कोड खाली यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सुरूवातीला या दोघांनी www.gainbitcin.com नावाची वेबसाईट तयार केली व त्याच्या माध्यमातून नेटवर सफरिंग करणारे, व्यावसायिक,डॉक्टर, गृहणी यांना जादा परताव्याचे प्रलोभन दाखवत अलगद जाळ्यात खेचले. कमीत कमी गुंतवणूक करा व जास्त रुपयांचा परतावा घ्या. आपले पैसे योग्य ठिकाणी लावा व यातून कसा फायदा होतो अशी मोटीव्हेशनल स्पिकरच्या माध्यमातून जाहिरात करत होते. 18 महिन्यात 180 टक्के फायदा अशाप्रकारचे प्रलोभन दाखवत होते. जेंव्हा ठरल्याप्रमाणे पैसे परत करण्याची वेळ आली तेंव्हा या दोघांनी लोकांना एम कॅप या चलनाचा परतावा केला.

अशी होती गेन बिटकॉईन कंपनीची ग्राहकांसाठी ऑफर

लोकांना गुंतवणूक करण्यासाठी आरोपी भारद्वाज याने आपल्या गेन बिटकॉई कंपनीच्या वतीने विविध प्रकारच्या ऑफर जाहिर केल्या होत्या. 18 महिन्यात 180 टक्के फायदा, तसेच कमीत- कमी गुंतवणूक 100 डॉलर तसेच 200 टक्के परतावा असा योजनेचा फायदा होणार, शिक्षण व्यावसाय यासाठी गुंतवणूक 90 टक्के फायदा 200 टक्के होणार, उच्चभ्रु लोकांसाठी गोल्ड, डायमंड आणि टायटनिक योजना चालवत होते. शिवाय या योजनेत जे लोक इतर लोकांना सहभागी करुन घेतील त्यांच्यासाठी देखील एक आकर्षक योजना असल्याचे सांगत असत.

नोटाबंदीच्या कालावधीत जास्त लोक बिटकॉईनच्या विळख्यात

2016 व 2017 या नोटाबंदीच्या कालावधीत जुने चलन गुंतवण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारचे मार्ग शोधत असताना या दोन आरोपींनी त्यांना आपल्या जाळ्यात खेचत त्याचा मोठा फायदा करुन घेतला. बिटकाईनमध्ये रोख रक्कम सुद्धा चालते अशी बतावनी करत त्यांनी लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे जमा केले. आंम्ही तुमचे पैसे बिटकाईन या आकर्षक योजनेत गुंतवले आहेत असे सांगितले.

अशी तयार केली गेन बिटकॉईन नावाची आभीसी कंपनी

आरोपी हे सायबर व्यावसायात पांरगत असल्यामुळे त्यांनी या अभ्यासाचा आपल्या व्यावसायात पुरेपूर फायदा करुन घेतला आहे. त्यांनी एक नव्हे तर तब्बल तीन कंपन्याची निर्मिती केली आहे. सुरूवातीला जानेवारी 2015 मध्ये सिंगापूरमध्ये गेन बिटकॉईन नावाची कंपनी निर्माण केली. त्यानंतर 27 एप्रिल 2016 रोजी फेज- एकची स्थापना केली. त्यामध्ये देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जास्त प्रलोभनाच्या ऑफर जाहिर केली.व लगेच काही दिवसानंतर 2017 मध्ये फेज- दोन ची स्थापना केली. पहिल्या कंपनीच्या स्थापनेपासून ते फेज दोन पर्यंत आरोपींनी गुंतवणुकदारांना प्रत्येक वेळी मोठी गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले आहे.

आभासी चलन केले हस्तगत

सुरुवातीला 32 बिटकॉईन, 80 इथर, व 39 नगद असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर या दोन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर 160 बिटॉईन, 3 लाख एम कॅप व 8 लाख इथर ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका बिटकॉईनची किंमत पाच लाख रुपयांच्या घरात आहे. तर एका एक कॅपची किंमत 14 रुपये आहे.

ज्याप्रमाणे कंपन्या आपला फंड तयार करतात त्याप्रमाणे आरोपींनी आपल्या गेन बिटकॉईन कंपनी मार्फत फंड तयार केला. तसेच या गुंतवणूक योजनेत प्रत्येक माणूस प्रत्येकाला अॅड करत असायचा त्यामुळे जो अॅड करेल त्याला 100 ते 200 डॉलरचे अमिष दाखवले जात असे. एवढेच नाही तर या दोघांनी या आभासी चलनाच्या कंपनीसाठी विविध पदावर लोकांची नेमणूक देखील केली. या कामामध्ये दोन्ही व्यक्तीला एकमेकांची नावे माहिती नसतात त्यामुळे या चलनाचा वापर अनेक गुन्हेगारी कामासाठी केला जातो.

भारतात सध्या हे आभासी चलन आहे वापरात

coin secure, Bitxoxo, Unocoin, Zebpay, Koinx, Bitcoin india, अनेक लोक विविध प्रकारचे व्यावहार करण्यासाठी या आभासी चलनाचा वापर भारतात करतात. सध्याच्या कालावधीत तर भारतात हे चलन प्रचलित आहे. या चलनाला भारत सरकारकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत मान्यता नाही.

2009 मध्ये सतोशी नाकामोटो या व्यक्तीने बिटकॉईन हे चलन बाजारात आणले मात्र अद्याप देखील ही व्यक्ती कोण आहे व कोणत्या ठिकाणावरुन हा व्यावहार चालतो याची खात्रीशीर अशी माहिती कोणाकडेही नाही. या चलनाचे मायनिंग चायना व अमेरिका या देशात होत होते. भारतात आत्तापर्यंत याची मायनिंग होत नव्हती मात्र भारतात देखील याची मायनिंग होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती आयटी तज्ज्ञांनी दिली आहे.

पुर्वी आभासी जगातात डेटाला मुल्य नव्हते मात्र सध्या डेटाला खुप मोठे मुल्य प्राप्त झाले आहे. बिटकॉईन हा प्रकार मुळात डेटा हाच आहे. सध्याच्या कालावधीत सांगायचे झाले तर डेटा म्हणजे आभासी दुनेयेमधील सोने आहे. अनेक लोक विविध प्रकारच्या मालाची खरेदी विक्री करण्यासाठी बिटकॉईनचा मोठ्याप्रामाणात वापर करतात. तसेच तुम्हाला 0.1 ते 0.5 पर्यंत बिटकॉईन विकता येतात. जेवढे पॉईंट येतील तेवढे पॉईंट विकता येतात. (आयटी तज्ज्ञ पंकज घोडे)

सदरची कारवाई पुणे शहराच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, आर्थिक व सायबर पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ व त्यांच्या सहकार्यानी केली.