बियरच्या ट्रकला अपघात, नागरिकांनी बियरचे बॉक्स पळवले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन

औरंगाबाद सोलापूर महामार्गावर पांढरी पिंपळगाव येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास बियरचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. या अपघातामध्ये चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले असून या अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी बियरचे बॉक्स घेऊन पळवून नेले.

भोपाळ येथून केरळकडे जाताना आज सोमवारी पहाटे चालकाला डुलकी लागल्याने बियरचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक औरंगाबाद सोलापूर महामार्गावर पांढरी पिपळंगाव पलटी झाला. यात कुठली ही जीवतहानी झाली नाही. तर या अपघाता नंतर रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी बियरचे बाँक्स पळविले.