बीडमध्ये हातभट्टी दारू पिवून एकाचा मृत्यू

बीड: पोलीसनामा ऑनलाईन 
बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील शेलापुरी येथील एका ४० वर्षीय व्यक्तीचा गावात मिळणारी हातभट्टी दारू पिवून सोमवारी मृत्यू झाला असल्याचा आरोप दामिनी दारूबंदी अभियानच्या सत्यभामा सौंदरमल यांनी केला आहे.

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव रफिक पठाण असे आहे. केवळ माजलगावच नव्हे तर बीड शहरासह जिल्ह्यात खूलेआम हातभट्टी दारू विक्री केली जाते. यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याचा आरोप निराधार समितीच्या सदस्यांनी केला आहे. रफिक पठाण याची आई ९५ वर्षाची असून रफिक हा तिला एकुलता एक मुलगा होता. मात्र तोही आता हातभट्टी दारू च्या अधिक सेवनामुळे मृत्यू झाला असल्याचे सुत्रांनी सांगितले.