ड्रग्स केस : NCB नं जप्त केले तब्बल 45 फोन, ‘बॉलिवूड’ची उडाली झोप !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर आता अनेक मोठे मासे एनसीबीच्या गळाला लागले आहेत. अनेक बडे कलाकार ड्रग्स कनेक्शनमध्ये फसताना दिसत आहेत. आता या ड्रग्सप्रकरणी नवीन घडामोडी समोर येताना दिसत आहेत. ड्रग्ज प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्धार करणाऱ्या एनसीबीनं आतापर्यंत 45 मोबाईल फोन जप्त केले आहेत. या मोबाईल फोनमधून बॉलिवूडच्या ड्रग गँगबद्दल मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. यातून अनेक सेलिब्रिटींची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एका वृत्तानुसार, एनसीबीनं जप्त केलेल्या 45 मोबाईल पैकी 15 पेक्षा अधिक मोबाईल फोनचे फॉरेंसिक रिपोर्ट एनसीबीला मिळाले आहेत. या आधारावर तपासाला नवी दिशा मिळाली आहे. एनसीबीनं दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, करिश्मा प्रकाश आणि जया साहा यांचेही फोन जप्त केले आहेत. त्यांच्या मोबाईल फोनचा फॉरेंसिक रिपोर्ट अद्याप आलेला नाही. यातूनही मोठा खुलासा होऊ शकतो. त्यांच्या मोबाईलचे रिपोर्ट चौकशीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनवर डंप डाटा येण्यापूर्वी जबाब रिव्ह्यु केल्यानंतर येणाऱ्या निकालानुसार पुढील रणनीती ठरवण्यात येईल. यात कॉल डिटेल्स, एसएमएस, व्हॉट्सअॅप चॅट या सर्वांचा तपास केला जाईल. 2017 ते 2020 पर्यंत डंप डाटा तपासण्यात येईल. साहजिकच हे सर्व इतकं सोपं नाही. यात अधिक काळ लागू शकतो. सोबतच यादरम्यान जर काही सुगावा लागला तर कारवाई करण्यात येईल.