भक्तांनी दान केलेले सोने वितळवून पांडूरंगाला सोन्याच्या विटा

पंढरपूर : पोलीसनामा आॅनलाईन
अठ्ठावीस युगापासून भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर उभा असलेला विठ्ठल आता सोन्याच्या विटेवर उभा राहणार आहे. पंढरपुरातील विठ्ठलाला भक्तांनी अर्पण केलेले सोने वितळवून सोन्याच्या विटा तयार करण्यात येणार आहेत.

राजा पंढरीचा

विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखों भाविक येत असतात. दर्शनासाठी आलेले भाविक आपापल्या एेपतीनुसार दान करतात. अनेक वर्षांपासून मिळालेले दान सांभाळणे मंदिर समितीसाठी जिकिरीचे झाले आहे.

आतापर्यंत दान मिळालेल्या वस्तुंमध्ये 25 किलो सोन्याच्या तर, 830 किलो चांदीच्या वस्तू आहेत. नोंद व देखभालीसाठी सोने वितळवून त्याच्या विटा बनवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

याचा वापर भाविकांच्या सुविधांसाठीही करण्याचा विचार समिती करत आहे. नुकत्याच झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. राज्य शासनानेही 2015 साली एक अध्यादेश काढून देवस्थानाला देणगी आलेल्या माैल्यवान वस्तूंबाबत सूचना दिल्या आहेत.