भर रस्त्यात पीएमपीएमएलची ढकल स्टार्ट बस रात्रभर सुरूच…

भोसरी : पोलीसनामा ऑनलाईन

भोसरी मधील गाव यात्रा मैदानालगत सोमवार रात्री पी.एम.पी.एम.एल बस सुरूच ठेवून चालक वाहक निघून गेले होते. बस सुरू ठेवण्याचा मागच कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.रात्री उशिरा नागरिकांनी बस सुरू असल्याची खात्री केली आणि याच चित्रकरण आपल्या मोबाईल मध्ये कैद केले आहे. याप्रकरणी पी.एम.पी.एम.एल चे जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड यांनी ती बस नादुरुस्त असल्याचं सांगितलं असून अधिक माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली.

भोसरी येथील गावयात्रा मैदाना शेजारी पी.एम.पी.एम.एल बस पार्क केल्या होत्या त्यातील एक बस सुरू असल्याची खात्री नागरिकांना झाली बस च्या आत डोकावून पाहिलं असता आत चालक,वाहक,प्रवाशी कोणीच नव्हते,मात्र बस सुरूच होती.एम एच-१२ के क्यू-०२११ ही बस तेथील मैदानाच्या शेजारी पार्क केलेली होती.त्यावेळी तेथून जाणाऱ्या सजक नागरिकांनी याच मोबाईल मध्ये चित्रीकरण केलं.बस तब्बल अडीच तास सुरूच होती,जेव्हा नागरिक तेथून निघून गेले त्यावेळी देखील बस सुरूच होती त्यामुळे ही बस केव्हा बंद झाली हा मात्र चर्चेचा विषय ठरू शकतो.पिंपरी-चिंचवड मध्ये काही वेळा विना चालक बस धावल्याचे नागरिकांनी अनुभवले आहे.

काही महिण्यापूर्वी पिंपळे गुरव बस स्थानकात आश्चर्यचकित करणारी घटना घडली होती,चालक-वाहकाविना उभी असलेली बस अचानक सुरू होऊन ९० मीटर अंतरावरील गॅरेजमध्ये शिरली.यात कोणितीही जीवित हानी झाली नव्हती. ही घटना ताजी असतानाच भोसरी येथे पी एम पी यम एल च्या चालकाचा निष्काळजी पणामुळे भोसरी मध्ये विनाचालक बस धावली होती.आता तर बस सुरू ठेवून चालक निघून गेल्याच समोर आलं आहे.