‘भाईजान’ सलमान खान २०२० पर्यंत देशभरात ३०० ‘जिम’ सुरु करणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा सुपस्टार सलमान खान सध्या खूप चर्चेमध्ये आहे. भारत चित्रपटानंतर सलमान खान खूपच चर्चेमध्ये आला आहे. या चित्रपटामध्ये सलमान खानसोबत अभिनेत्री कॅटरिना कैफने काम केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल केली आहे. सलमान खान सोशल मिडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. तो सोशल मिडियावर चाहत्यांसाठी अनेक फिटनेसच्या व्हिडिओची झलक दाखवित असतो. चाहते त्याच्या व्हिडिओला खूप पसंत करतात आणि कमेंट करत असतात. व्हिडिओद्वारे सलमान खान चाहत्यांना फिट आणि स्वस्थ राहण्यासाठी सल्ला ही देत असतो.

सलमान खान ‘एसके-२७ फ्रेंटाइजी’ लॉंच करण्यासाठी तयार आहे. त्याने २०२० साली देशभरातमध्ये ३०० जिम सुरु करण्याची योजना केली आहे. सलमान खानने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘बीइंग ह्यूमन चेन’ आणि ‘बिंग स्ट्रॉंग’ फिटनेस इक्किपमेंटनंतर सलमान खान जिम आणि फिटनेस सेंटर सुरु करणार आहे.

एसके-२७ चे लक्ष फिटनेस इंडिया मूवमेंटचा संदेश पसरविण्यासोबत प्रत्येक व्यक्ती फिट आणि हेल्दी रहावा. त्याचबरोबर फिटनेस ट्रेनर आणि उद्योजकांसाठी रोजगारची संधी उपलब्ध करुन द्यायची आहे. सलमान खानने यावर्षी एप्रिल महिन्यात आपल्या फिटनेस उपकरण ‘ब्रॅंड बीइंग स्ट्रॉंग’ लॉंच केले होते. असे समजले जाते की, देशभरात १७५ पेक्षा जास्त जिमची स्थापना केली गेली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !