भारताची अर्थव्यवस्थेची सर्वात वाईट कामगिरी : अर्थतज्ज्ञ

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वाईट कामगिरी करणारी अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, असे मत नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. भारताची अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्नांना तोंड देण्यासाठी सरकारकडून देण्यात येणारा उत्तेजन निधी पुरेसा नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

देशाचा आर्थिक विकास दर जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये सुधारलेला दिसणार आहे . भारताचा आर्थिक विकासदर हा कोरोनाच्या साथीच्या आधीपासूनच मंदावलेला होता. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वाईट कामगिरी करणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये चालू तिमाहीत सुधारणा पहायला मिळेल, असे मत मांडतानाच बॅनर्जी यांनी 2021 चा आर्थिक विकास दर या वर्षीपेक्षा चांगला असेल अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

सध्या अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत असणार्‍या बॅनर्जी यांनी भारताकडील नागरिकांना दिले जाणारे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज पुरेसे नसल्याचे मत व्यक्त केले आहे. जागतिक स्तरावर विचार करता भारताला आणखीन सक्षम होण्याची गरज आहे. भारतामध्ये आर्थिक प्रोत्साहन म्हणून देण्यात आलेला निधी हा मर्यादित आहे. अल्प उत्पन्न असणार्‍या वर्गातील लोकांकडून अधिक खर्च होत असल्याचे पाहायला मिळाले नाही. सरकार या लोकांच्या हातात पैसे देण्यास इच्छुक असल्याचे दिसत नाही, असे मत बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे.