भाषणबाजी करणाऱ्या सरकारचा बळी : सामना

पोलीसनामा ऑनलाईन:
धर्मा पाटील यांनी आपल्याला जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयात विषप्राशन केले त्यात त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
याच घटनेवर आधारीत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधुन धर्मा पाटलांची हत्या या अग्रलेखातू न भाजप सरकारवर टिका करण्यात आली.
धर्मा पाटील यांचा मृत्यू हा भाषणबाजी करणाऱ्या सरकारचा बळी आहे.
भाषणबाजीने रोटी, कपडा आणि निवाऱ्याचा प्रश्न सुटणार नाही. धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली आहे. जे घडले ते विदारक आहे. याला राज्य करणे म्हणता येत नाही. मुख्यमंत्री राज्य चालवा, भाजप चालवू नका. धर्मा पाटलांच्या मृतदेहावर तुमचे राज्य आहे. धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमच्या खुर्च्या जाळून टाकील. धर्मा पाटील यांना मृत्यूस कवटाळावे लागले. कारण अधर्माच्या राज्यात त्यांचे ऐकणारे कुणी नव्हते. भाषण माफियांना डोलणारी व टाळ्य़ा वाजवणारी माणसे हवी आहेत. त्यामुळे ‘धर्मा’ पाटलांचे सत्य कोण ऐकणार?
अशा आशयाचा हा अग्रलेख आहे. धर्मा पाटील यांचा मृत्यू झाला असला, तरी त्यांची चिंगारी राज्यातील अनेक शेतकऱ्याच्या मनात वणवा पेटवणारी ठरणार आहे. अच्छे दिन’ आले व सर्वत्र आबादी आबाद आहे असे चित्र रंगवणाऱ्या थापेबाज टोळीने धर्मा पाटील यांची हत्या केली आहे. त्यामुळे हे सरकार भाषण माफियांचे असल्याचेही सामनात म्हटलं आहे.
धर्मा पाटील यांच्या हत्येस सरकारी यंत्रणाच जबाबदार आहेत आणि संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारी यांच्यावर धर्मा पाटलांच्या मृत्यूबद्दल सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी कोणी करीत असेल तर ते चुकीचे नसल्याचं देखील म्हटलं आहे.