भुजबळ साहेब सोमवारी बाहेर येतील -धनंजय मुंडे

मुंबई पोलिसनामा ऑनलाईन

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर केईएम रुग्णालयात त्यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे गेले होते पण त्यांची भेट होऊ शकली नाही. सोमवारी भुजबळ बाहेर येतील अशी माहिती यावेळी मुंडेंनी दिली.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांना शुक्रवारी 4 मे रोजी जामीन मिळाला. भुजबळांच्या वैद्यकीय तपासण्यासाठी ते केईएम रुग्णालयात आहे. आज धनंजय मुंडे यांनी केईएम रुग्णालयात जाऊन भुजबळांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, भुजबळांशी त्यांची भेट झाली नाही. ते डॉक्टरांशी चर्चा करून माघारी परतले. भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते सोमवारी बाहेर येतील अशी प्रतिक्रीया मुंडे यांनी दिली.