मंगळ ग्रहावर सापडलं पाणी, तेथील जमीनीत गाडले गेलेत 3 तलाव

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ एजन्सी नासा (NASA) च्या शास्त्रज्ञांनी मंगळ (Mars) ग्रहावर पाण्याचा स्त्रोत शोधला आहे. शास्त्रज्ञांना मंगळाच्या जमीनीच्या आत तीन तलाव सापडले आहेत. दोन वर्षांपूर्वी सुद्धा मंगळ ग्रहाच्या दक्षिण ध्रुवावर एक खुप मोठा खार्‍या पाण्याचा तलाव सापडला होता. हा तलाव बर्फाच्या खाली दबला गेला आहे. म्हणजे या पाण्याचा वापर केल्यास भविष्यात मंगळ ग्रहावर जाऊन राहता येऊ शकते.

युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) च्या स्पेसक्राफ्ट मार्स एक्सप्रेसने 2018 मध्ये मंगळ ग्रहावर ज्या ठिकाणी बर्फाच्या खाली खार्‍या पाण्याचा तलाव शोधला होता, त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी 2012 ते 2015 पर्यंत मार्स एक्सप्रेस सॅटेलाइट 29 वेळा त्या भागातून गेले, आणि फोटो घेतले. त्याच परिसराच्या जवळपास यावेळी आणखी तीन तलाव दिसले आहेत. या तीन तलावांसाठी स्पेसक्राफ्टला 2012 ते 2019 च्या दरम्यान 134 वेळा ऑब्जरर्वेशन करावे लागले.

मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर पाणी द्रवरूपात दिसून आले आहे. नेचर अ‍ॅस्ट्रोनॉमी मॅगझीनमध्ये हा रिपोर्ट प्रकाशित झाला आहे. 2018 मध्ये शोधण्यात आलेले सरोवर मंगळ ग्रहाच्या दक्षिण ध्रुवावर आहे. ते बर्फाने झाकले गेले आहे. ते सुमारे 20 किलोमीटर रूंद आहे. हे मंगळ ग्रहावर आतापर्यंत सापडलेले सर्वात मोठे सरोवर आहे.

रोम युनिव्हर्सिटीच्या अ‍ॅस्ट्रोसायंटिस्ट एलना पेटीनेली यांनी म्हटले की, आम्ही दोन वर्षांपूर्वी शोधलेल्या तलावाच्या जवळपास आणखी तीन तलाव शोधले आहेत. मंगळ ग्रहावर पाण्याच्या स्त्रोतांची खुप दुर्मिळ आणि संरचना दिसत आहे. जी आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.

मंगळ एक कोरडा आणि नापीक ग्रह नाही, जसे की अगोदर विचार केला होता. काही ठराविक स्थितीत पाणी द्रव अवस्थेत मंगळावर आढळले आहे. शास्त्रज्ञ मोठ्या कालावधीपासून हे समजत होते की, संपूर्ण लाल ग्रहावर एकेकाळी पाणी मोठ्या प्रमाणात वहात होते. तीन अरब वर्षापूर्वी जलवायुत झालेल्या मोठ्या बदलांमुळे मंगळाचे संपूर्ण रूप बदलले.

ऑस्ट्रेलियाच्या स्विनबर्न विद्यापीठाचे सहायक प्रोफेसर एलन डफी यांनी यास मोठे यश म्हटले आहे. ते म्हणाले, यामुळे जीवनाच्या अनुकूल स्थितीची शक्यता खुली होते. यापूर्वी अंतराळ एजन्सी नासाने घोषणा केली होती की, मंगळावर 2012 मध्ये उतरलेल्या शोधकर्ता रोबोट क्यूरियोसिटीला टेकड्यांमध्ये तीन अरब वर्ष जुने कार्बनिक अणु सापडले होते. हे या गोष्टीकडे निर्देश करते की, त्याकाळी या ग्रहावर जीवन असावे.

अमेरिकन रोबोट्स रोवर क्यूरियोसिटी आणि ईएसएच्या सॅटेलाइट्समुळे याचा शोध घेणे सोपे झाले आहे की, मंगळावर कोणत्या ठिकाणी आर्द्रता आहे. रोवर्सने शोध लावला आहे की, येथील हवेत खुप जास्त आर्द्रता आहे. या ग्रहाच्या पृष्ठभागाचा शोध घेणार्‍या रोवर्सला आढळले की, येथील माती अगोदर वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा किती तरी जास्त ओलसर आहे.