मंत्रालयाच्या मागील बाजूस कारने घेतला पेट

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन
मंत्रालयाच्या पाठीमागच्या बाजूला अचानक एका कारने पेट घेतला आहे. या घटनेमुळे मंत्रालय परिसरात  खळबळ उडाली असून वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. अचानक लागलेल्या आगीचे कारण समजलेले नाही. घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली असून अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे.