मटका आड्डा चालवणा-या दोन टोळ्या हद्दपार

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

इस्लामपूर शहर परिसरात बेकायदा मटका अड्डे चालवणा-या तसेच शहरात गुंडगिरी करुन दहशत माजवणा-या दोन टोळ्यांतील बारा जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून टोळीतील सदस्यांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी शुक्रवारी (दि.२०) हद्दीपारीचे आदेश दिले.

सुशांत सुभाष पाटील (वय 28, रा. शिवाजी चौक, इस्लामपूर), शिवाजी मुर्गाप्पा बामणे (वय 27, रा. साखराळे), अरूण वसंत तोंदळे (वय 50, रा. ताकारी), रमेश बापू गडकरी (वय 38, रा. बोरगाव), फिरोज नजीर मुंडे (वय 52, रा. इस्लामपूर), मोहन सुरेशचंद्र पिसे (वय 45, रा. इस्लामपूर), दीपक निळकंठ चितारे (वय 48, रा. इस्लामपूर), राजेंद्र दगडू सूर्यवंशी (वय 42, रा. इस्लामपूर), किर्तीकुमार रूपचंद शहा (वय 40, रा. इस्लामपूर), चंद्रकांत एकनाथ यादव (वय 50, रा. इस्लामपूर), रमेश राजाराम लोळगे (वय 40, रा. इस्लामपूर), सचिन जगन्नाथ गुरव (वय 33, रा. इस्लामपूर) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत.

या दोन्ही टोळ्या इस्लामपूर शहर आणि परिसरात बेकायदा मटका अड्डे चालवत होते. अड्डा चालवत असलेल्या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोक येत होते. यामुळे या टोळक्यांचा महिला, शाळकरी मुले, मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत हता. तसेच या टोळक्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अधीक्षक शर्मा यांनी दोन टोळ्यांतील बाराजणांना तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.