मतमोजणीला सुरूवात, उमेदवारांची धाकधूक वाढली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्यातील प्रत्येक मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहे. यासाठी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज ठरणार आहे.

राज्यात 12, 19, 23 आणि 29 एप्रिल अशा चार टप्प्यामध्ये लोकसभेसाठी मतदान पार पडले होते. यामध्ये नितीन गडकरी, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे, सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा यांच्यासह अनेक उमेदवारांचे भवितव्य मत यंत्रात बंद झाले होते.

उमेदवारांचे कार्य़कर्त्यांनी मतमोजणीच्या ठिकाणी पोहचत आहेत. उमेदवार देवाचे दर्शन घेऊन मतमोजणी केंद्रावर जात आहेत. प्रत्येक उमेदवाराची धाकधुक वाढली आहे. सगळ्या देशाच्या नजरा या निकालाकडं लागल्या आहेत. काय असतील निकाल, कोण मारणार बाजी ? नरेंद्र मोदींना पुन्हा संधी मिळणार का ? एक्झिट पोल प्रमाणे निकाल लागतील की वेगळं काही होईल ? काँग्रेसला किती जागा मिळतील. महाआघाडीचं काय होणार ? असे असंख्य प्रश्न विचारले जात आहेत.