मथुरा महामार्ग अपघातात महाराष्ट्रातील तीन डाॅक्टरांचा जागीच मृत्यू

मथुराः वृत्तसंस्था
यमुना महामार्गावर रविवारी सकाळी मथुरा येथे झालेल्या भीषण अपघात महाराष्ट्रातील तीन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात इतर चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात माइल स्टेशन 88 जवळ झाला असून अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्वच डॉक्टर ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स)चे असल्याचे समजते. या अपघातातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील डॉक्टर हर्षद वानखेडे यांचाही समावेश आहे. ते अकोला जिल्ह्यातील रहिवासी होते.यातील इतर दोन डॉक्टरांची नावे अद्याप समजलेली नाहीत.

दिल्ली ते आग्राच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीमध्ये सात प्रवासी होते. त्याचवेळी ही कार मागून एका कंटेनरमध्ये घुसली.
या अपघातात महाराष्ट्रातील डॉक्टर हर्षद (35), हरियाणातील हेमबाला (25) आणि चंदीगडचे यशप्रीत (26) यांचा जागीच मृत्यू झाला. मध्यप्रदेशचे जीतेंद्र , बिहारचे महेश अभिनव आणि त्रिपुराच्या केफमिन जखमी आहेत. प्राथमिक माहितीनुसार,हे सर्वजण नोएड्यातून आग्रा येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी जात होते.