मनसेकडून नाणार प्रकल्प कार्यालयाची तोडफोड

मुंबई : वृत्तसंस्था
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात आणि कोकणात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर आक्रमक झालेल्या मनसे कामगार सेनेने मुंबईतील ताडदेव येथील नाणार प्रकल्पासाठी काम करणारे कार्यालय फोडले. मनसे कार्यकर्त्यांनी ताडदेव येथील रिफायनरी अँड पेट्रो-केमिकल लिमिटेडवर मनसैनिकांनी हल्ला चढवत कार्यालयाची तोडफोड केली.
मुलुंडमध्ये मनसेच्या वतीने १०० महिलांना रोजगाराचे साधन मिळावे म्हणून त्यांना रिक्षांचे वाटक करण्यात आले. या कार्यक्रमाच्यावेळी राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्प होऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता.
”नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही. हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही, तर गुजरातला जाईल,” अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवतात. मात्र, गुजरातच का, असा सवाल करत प्रकल्प कुठेही न्या, पण तो कोकणात होणार नाही, राज्य सरकारला काय करायचं ते करावे,असे राज ठाकरे म्हणाले होते.