मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंना काळे फासले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना काळे फासळ्यांची घटना औरंगाबाद येथे घडली. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले.

औरंगाबादेत आज राज्य मागासवर्गीय आयोगाची समिती आरक्षणाबाबत जन सुनावणी करत आहे. त्यासाठी नागरिक निवेदन देत आहेत. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी आले होते. याचवेळी सराटे यांना काळे फासले गेले. सराटे यांच्या शिवाजी प्रबोधिनी या संस्थेला मराठवाड्यातील मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. याला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध आहे. कारण, सराटे यांनी मराठा आरक्षणात खोडा घालण्याचे काम केले, तसेच एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू असताना, बाळासाहेब सराटे यांनी चुकीची याचिका दाखल केल्याचाआरोपही त्यांच्यावर आहे. असा काळे फासणाऱ्यांचा आरोप आहे.