मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड पुणे शहर अध्यक्ष पदासाठी प्रफुल्ल गुजर एकमेव दावेदार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेची कार्यकर्ता मेळावा महत्वाची बैठक दि.१५एप्रिल २०१८ रोजी शिवाजी व्यायाम मंडळ शिवाजी नगर गावठाण या ठिकाणी पार पडली. या बैठकीचे आयोजन संघटनेचे मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर यांनी संघटनेच्या महत्वाच्या नियुक्त्या व ध्येय धोरणांसाठी संघटनेचे अध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार केले होते.

सदर बैठकीस जेष्ठ कामगार नेते मा.नाना निवंगुणे,शेकापचे शहर अध्यक्ष सागर आल्हाट,अनिल ताडगे,प्रफुल्ल गुजर,विश्वजीत चौघुले,अंगद माने,पंकज घाडगे,राहूल दुर्गे,सचिन गवळी,सागर पवार,निलेश गायकवाड,आकाश तापकीर तसेच पुणे शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे महत्वाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

याच बैठकीत संघटनेच्या ध्येय धोरणा तसेच पुणे शहराध्यक्ष पदाच्या नियुक्ती संदर्भात चाचपणी करण्यात आली असता त्यासाठी पुणे शहरातुन प्रफुल्ल गुजर यांचे नाव शहर अध्यक्ष पदासाठी पुढे आले असता उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावास सहमती दर्शवून पाठींबा दिला. प्रफुल्ल गुजर यांच्या रुपात शहराध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडला स्थानिक जनसंपर्क असलेला बहूजन चळवळीतील व आंबेडकरी चळवळीशी सलोख्याचे संबध असलेला तरुण व आक्रमक शहराध्यक्ष मिळेल अशी भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

सदर बैठकीत पुणे शहर प्रमुख हा पुण्यातील स्थानिक रहिवासी असावा तसेच त्याला पुण्यातील राजकिय, सामाजिक,सांस्कृतिक व भौगोलिक अशा सर्व क्षेत्रातील जान असणारा अध्यक्ष असावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे.तरी पुढील बैठकीत या निवडी संदर्भात अजुन चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असे मत कुंजीर यांनी व्यक्त केले.