महागड्या सायकली चोरणारे पोलीसांच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा आॅनलाइन – शहरातील विश्रामबाग सरस्वतीनगर येथे महागड्या सायकली चोरणाऱ्या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन महागड्या सायकली आणि एक लोखंडी गेट असा एकून १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संतोष तुकाराम गवळी (वय २८, रा. मोती चाैक, बापट मळा), संदीप दत्तात्रय माळी (वय ३५ माळी गल्ली, सांगली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रविवारी दुपारी गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली असून याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचे एक पथक विश्रामबाग परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी संतोष गवळी आणि संदीप माळी हे दोघे संशयित सायकलवरून एक लोखंडी गेट घेऊन जाताना दिसले.

त्यांच्या संशयास्पद हालचालीमुळे पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतली. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी दोन्ही सायकली आणि गेट चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पुजारी, अमित परीट, विनोद चव्हाण यांनी ही कारवाई केली.