महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा संघटकपदी अब्बास शेख तर दौंड तालुका अध्यक्षपदी सचिन आव्हाड यांची निवड

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा संघटकपदी अब्बास शेख तर दौंड तालुका अध्यक्षपदी सचिन आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंगळवार दि .२० मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र राज्य मराठी संघाच्या पुणे येथील कार्यालयात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे साहेब आणि राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटेसर यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य सचिव सुरेखा खाणोरे मॅडम आणि जिल्हा अध्यक्ष सिताराम लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला .
यावेळी संघाच्या राज्यसचिव सुरेखा खाणोरे मॅडम आणि जिल्हा अध्यक्ष सिताराम लांडगे यांच्या हस्ते सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची दौंड तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे दौंड तालुका अध्यक्ष सचिन आव्हाड, कार्याध्यक्ष मानसिंग रुपनवर , उपाध्यक्ष प्रशांत वाबळे , सचिव अमोल होले, सहसचिव पुजा भोंडवे, खजिनदार अलिम सय्यद, सह खजिनदार वाजिद बागवान, संपर्क प्रमुख अतुल काळदाते आणि तालुका संघटक पदी हनुमंत हंडाळ यांची निवड करण्यात आली .
यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले तसेच पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.