मांजामुळे गळा कापला गेलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पंतग उडविण्यासाठी वापरण्यास बंदी असलेल्या चिनी मांज्याने गळा कापला गेल्याने गांभीर जखमी झालेल्या महिलेचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुवर्णा मुजूमदार असे त्यांचे नाव आहे.

बुधवारी (दि. ७) सायंकाळी सहाच्या सुमारास पुणे महापालिकाभवनाकडे जाणाऱ्या शिवाजी पुलावरून दुचाकीवरून त्या घरी जात होत्या. त्यावेळी चिनी मांजा गळ्याभोवती गुंडाळल्याने त्यांचा गळा कापला गेला आणि त्या गंभीर जखमी झाल्या. यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान आज अखेर त्यांचा मृत्यू झाला.

शहरात पतंग उडविण्यासाठी अत्यंत घातक “नायलॉन’चा चिनी मांजा सर्रास वापरला जात आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाची बंदी असूनही शहरातील काही दुकानांमध्ये हा मांजा विकला जात आहे. परिणामी, या मांजामुळे अनेक किरकोळ व गंभीर अपघात होत आहेत. मुजुमदार या एका अग्रगण्य दैनिकाच्या जाहिरात व मार्केटिंग विभागात काम करत होत्या.