“माझे गाडगीळ आडनाव नसते तर काँग्रेसमध्ये राहिलो नसतो” : आमदार अनंत गाडगीळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कॉंग्रेस पक्षातील घडामोडींवर आमदार अनंत गाडगीळ नाराज असून “माझे गाडगीळ आडनाव नसते तर काँग्रेसमध्ये राहिलो नसतो’ असे उद्विग्न उद्गार त्यांनी एका खाजगी बैठकीत बोलताना काढले अशी चर्चा आहे.

लोकसभा उमेदवारीसाठी आमदार गाडगीळ इच्छूक होते. परंतु, प्रदेश समितीने त्यांचे नाव गाळले. निवडणूकीचा खर्च मोठा असतो तो त्यांना झेपणार नाही असे कारण दिल्याचे तेव्हा बोलले गेले. पुण्यात स्थानिक पातळीवर आणि प्रदेश पातळीवर उमेदवारीवरून गोंधळ चालू आहे, त्यामुळे ते नाराज आहेत. उमेदवार यादी जाहीर होत नसल्याने भाजपला फायदा होतो आहे. प्रदेश समितीने नांवाची शिफारस डावलली आणि त्यानंतर मला उमेदवारीचा आग्रह काही नेत्यांनी केला. पण, मी स्पष्ट विरोध केला, गाडगीळ आडनाव नसते तर मी काँग्रेसमध्ये राहिलो नसतो असे ते उद्वेगाने म्हणाले, असे समजते.

पुण्यामध्ये गाडगीळ घराणे हे काँग्रेसचे घराणे समजले जाते. काकासाहेब गाडगीळ, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ हे काँग्रेसचे नेते होते. केंद्रात मंत्रीपदे त्यांनी भूषविली. विठ्ठलराव गाडगीळ हे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते होते. स्वतः अनंतराव गाडगीळ कॉंग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते आहेत.