माढ्यातील ‘या’ उमेदवाराचा मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध

माढा : पोलीसनामा ऑनलाइन – मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असतांनाच भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठा धक्का बसला आहे.  मराठा क्रांती मोर्चाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा निषेध करण्यात आला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या २३ एप्रिलला होणार आहे. महाराष्ट्रातील १४ मतदार संघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. यामध्ये माढा मतदार संघाचा देखील समावेश आहे. दरम्यान,  माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असतांनाच मराठा क्रांती मोर्चाने मोठा धक्का दिला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मराठा क्रांती मोर्चा कडून निषेध करण्यात आला. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करू नका असे आवाहनही मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी केले आहे.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरसाळे इथल्या सभेत मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या युवकांची मदत तसेच मराठा मोर्च्याच्या काळात १४०० पेक्षा अधिक युवकांवर दाखल केलेल्या केसेस मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनावर प्रश्न विचारल्याने चिडून मला सभेतून ओढून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली. असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी केला आहे.

दरम्यान रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आणि आता लोकसभेची उमेदवारी लढवत आहेत. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा कडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा निषेध करण्यात आला आहे.