मानवीवस्तीत बिबट्याचा शिरकाव ; कुत्र्याने बिबट्याला लावले पिटाळून

पुणे (जुन्नर) : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अनेक महिण्यापासून पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे मानवीवस्तीकडे ते येत आहेत. मंचरच्या चांडोली येथील घरापाशी बिबट्या आला होता. शेजारीच वीटभट्टी देखील आहे, परंतु रात्र असल्याने काम आणि घरे दोन्ही बंद असल्याने बिबट्याने कुठलाही हल्ला केला नाही. बिबट्या वावरत असताना परिसरातील कुत्र्यांनी त्याला पिटाळून लावले आहे. कुत्रे भुंकताच बिबट्याने माघार घेतली आणि पळ काढला. हा सर्व प्रकार सिसिटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

पुण्याच्या जुन्नर, आंबेगाव, शिरूर भागातील बिबट्याचा वावर सर्वांनाच माहीत आहे. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास चांडोली येथील थोरतांच्या घराजवळ बिबट्या आला होता. शेजारीच वीट भट्टी आणि घरे होती. मात्र रात्र असल्याले दोन्ही बंद होते त्यामुळे बिबट्याकडून कोणताही हल्ला झाला नाही. याच ठिकाणी ११ ऑक्टोबर च्या मध्यरात्री बिबट्या आला होता, तेंव्हा कुत्र्याने बिबट्याने पळ काढण्यास भाग पाडले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून बिबट्या कुत्र्यांना घाबरून पळाल्याचे दिसत आहे. या परिसरात बिबट्या वारंवार आढळतात. त्यामुळे त्यांचा वेळीच वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.