मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही : एकनाथ शिंदे

नगर : पोलिसनामा ऑनलाइन
”नगरमधील निष्ठावान शिवसैनिकांची हत्या झाली. त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही. शिवसेना दोन्ही कुटुंबियांना कधीही अंतर देणार नाही,” असे म्हणत सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

नागरयेथील केडगाव येथे दहा दिवसांपूर्वी दोन शिवसैनिकांची निर्घृण हत्या झाली. आज त्या शिवसैनिकांच्या दशक्रिया विधी दरम्यान ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री दादा भुसे, माजी आमदार अनिल राठोड, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, महापौर सुरेखा कदम आदी उपस्थित होते.

”महाराष्ट्र कधीही शिवसैनिकांची हत्येची घटना घडली नाही. संपूर्ण शिवसेना दोन्ही कुटुंबियांच्या पाठीशी आहे. शिवसैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. मारेकऱ्यांना कडक शिक्षा होईपर्यंत शिवसेना त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे,”मंत्री दादा हुसेन म्हणाले.