मित्रांनीच दगडाने ठेचून केला मित्राचा खून

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

येरवडा येथील काॅमर्स झोनच्या मैदानावर बुधवारी नितीन कडाळे (वय:25,रा. पंचशीलनगर येरवडा ) या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून झाला होता. याप्रकरणीअजिंक्य विजय कांबळे व गणराज स्वामी (रा. दोघेही पंचशील नगर येरवडा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी हे खून झालेल्या तरुणाचे मित्र आहेत.आरोपी व खून झालेला तरुण हे तिघे मिळून काॅमर्स झोनच्या मैदानावर दारू पिण्यासाठी एकत्र बसले असता दारुच्या नशेत एकमेकांना शिवीगाळ करत होते. नशेतील शिवीगाळीचे रुपांतर भांडणात झाले. मृत तरुणाने आई- वडीलांना शिवीगाळ केली म्हणून रागाच्या भरात खून केल्याची कबूल आरोपींनी पोलिसांना दिली आहे.

त्यानंतर तातडीने येरवडा पोलीस, गुन्हे शाखा तपास पथक, न्यायवैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनी देखील घटनास्थळा भेट दिली होती. नितीन व त्याचे मित्र काल रात्री बाहेर गेले होते. त्यानंतर त्यांचा संपर्क झाला नसल्यामुळे पोलिसांना या दोन मित्राबद्दल संशय होता. त्या दृष्टीकोनातून तपास केला असता खुनाचा उलगडा झाला.

सदरची कारवाई परिमंडल-4 चार चे पोलीस उपायुक्त दिपक साकोरे, खडकी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक अनिल लोहार, राजेंद्र कांबळे, सहाय्यक पोलीस फौजदार बाळासाहेब बहिरट, पोलीस हवालदार हणमंत जाधव, अजिज बेग, पोलीस नाईक शरद बांगर, गणेश पाटोळे, पोलीस शिपाई विष्णु सरवदे, सागर कोतवाल, सचिन यांनी केली.

संबंधित घडामोडी:

येरवड्यात तरुणाचा खून