मिलिंद एकबोटेंच्या जामीन अर्जावर 29 मार्च रोजी सुनावणी

पुणे:पोलीसनामा ऑनलाईन
कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी अटक केलेले आणि आता येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले मिलिंद एकबोटे यांच्या जामीन अर्जावर 29 रोजी सुनावणी होणार आहे. त्यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

दरम्यान, दंगलीच्या वेळी वाहन जळालेल्या संजय भालेराव यांची तक्रार घेण्यासही न्यायालयाने सांगितले आहे. तपास अधिकारी यांनी स्टेशन डायरी आणि जबाब न्यायालयात सादर करावा असेही सांगण्यात आले आहे.