मिलिंद एकबोटेंना काळे फासण्याचा प्रयत्न करणारा अटकेत

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी अटकेत असलेले मिलिंद एकबोटे यांच्यावर आज न्यायालयात काळे फासण्याचा प्रयत्न केला. एकबोटेंना आज कोर्टात हजर करण्यात आले होते.

न्यायालयात न्यायाधीशांच्या कक्षेबाहेर हा प्रकार घडला. मिलिंद एकबोटेंवर शाई फेकण्याचा प्रयत्न करणारा तरुण संजय हरिदास वाघमारे यांच्यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय वाघमारेला सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि धक्काबुक्की करणे या गुन्ह्यांत शिवाजी नगर पोलिसांनी अटक केलीय.

संजय हरिदास वाघमारे याच्यावर २०१० मधे शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये स्त्रिया आणि आर्म्स एक्ट अंतर्गत गुन्हा नोंद आहे. त्याचबरोबर बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये देखील फौजदारीचा गुन्हा नोंद आहे.

दरम्यान, मिलिंद एकबोटेच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

संबंधित घडामोडी:

आंबेडकर, मेवाणीला अटक करून ब्रेनमॅपिंग करा : संभाजी भिडे

कोरेगाव-भीमा प्रकरणी शिक्रापूर पोलिसांकडून मिलींद एकबोटे यांची कसून चौकशी

मिलींद एकबोटे यांना उद्या न्यायालयात हजर करणार