मुंढवा मगरपट्टा उड्डाणपुलाचे प्रायोगिक उद्धघाटन

हडपसर :पोलिसनामा ऑनलाईन 

महापालिका निधीतून मुंढवा व मगरपट्टा भागास जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे प्रायोगिक उद्धघाटन ग्रामस्थ व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केले. राष्ट्रवादीच्या पाठपुराव्याने पुलाचे काम झाले असताना भाजपच्या चमकोगिरीवर सर्वस्तरातून टीका होत आहे.
मगरपट्टा व मुंढवा या मार्गावर सतत होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष बापू पठारे यांनी उड्डाणपुलाचा प्रस्ताव पालिकेत मंजूर करून घेतला व निधीची तरतूद केली. त्यानंतर २०१२ मध्ये नगरसेविका चंचला कोद्रे यांनी पाठपुरावा करून उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले. या पुलास २० कोटी रुपये खर्च आला आहे. पुलाची रुंदी १९ मीटर व तीनशे मीटर लांब आले. दरम्यान माजी महापौर चंचला कोद्रे यांचे निधन झाल्याने या पुलास स्व.चंचला संदीप कोद्रे उड्डाणपूल नाव देण्याचा ठराव केला आहे.

मुंढवा -खराडी या मार्गावर वाहतुक कोंडी नित्याचीच झाली आहे. याकरीता महापालिकेडून मुंढवा नदीवरील जुना ब्रिटिशकालीन पूल अरुंद पडत असल्याने येथे समांतर पूल महापालिकेच्या वतीने बांधण्यात आला आहे. याचे भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. तीन वर्षानंतर याचे काम पूर्ण झाले आहे. येथील कामाची पाहणी महापालिका विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नगरसेवक बंडूतात्या गायकवाड, नगरसेविका हेमलता मगर, माजी उपमहापौर निलेश मगर, महापालिका प्रकल्प प्रमुख श्रीनिवास बोनाला, कार्यकारी अभियंता प्रसन्न जोशी, कनिष्ठ अभियंता विजय दाभाडे, प्रकल्पाचे कॉन्ट्रॅक्टर आतूर कंपनीचे कुलकर्णी यांनी केली होती व प्रायोगिक तत्वावर पूल चालू करून पालिकेच्या वतीने उद्धघाटन करण्यात येणार होते. ग्रामस्थ व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पुलाचे उद्धघाटन करून पूल वाहतुकीस सुरू केला आहे.

नदीवरील खराडी – मुंढवा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.यामार्गाने जाताना वाहतूक कोंडीमध्ये अडकणे हे नित्याचेच झाले आहे. या मार्गशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही राष्ट्रवादीचे बापू पठारे व दिवंगत नगरसेविका चंचला कोद्रे यांनी पाठपुरावा करून उड्डाणपूल पूर्ण केला. चेतन तुपे विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांकडून ग्रामस्थांच्या उपस्थिती मध्ये उड्डाणपूलाचे उद्धघाटन झाले.