मुंबईतील दहिसर परिसरात घरगुती सिलेंडरचा स्फोट, महिलेसह दोन मुले होरपळली

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन
दहिसरमध्ये मंगळवारी सकाळी घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एका महिलेसह दोन मुले होरपळली असून, त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी महिला आणि दोन्ही मुलांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी दहिसर पोलीस अधिक चौकशी करत आहेत.