मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किमान वेग ताशी ८० कि.मी बंधनकारक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील पहिल्या लेनमध्ये अनेकदा वाहन चालक कमी वेगाने वाहने चालवताना दिसतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.
ही बाब लक्षात घेऊन वाहतूक विभागाने अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच या आदेशातून रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने यांना वगळण्यात आले आहे.
याबाबतची अधिसूचना वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी जाहीर केली आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावर पहिल्या मार्गावरून वाहने चालवताना ताशी ८० किलो मीटर वेगाने गाडी चालवणे बंधनकारक असणार आहे.

द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांनी डाव्या बाजूच्या मार्गिकेमधून, तर हलक्या वाहनांनी मधल्या मार्गिकेमधून वाहने चालवणे अपेक्षित आहे. आणि उजव्या बाजूची पहिली मार्गिका ही वाहनांना ओव्हरटेकिंग करण्यासाठी राखीव ठेवणे अपेक्षित आहे. मात्र अनेकदा घालून दिलेले नियम न पाळल्यामुळे अपघात होतात.