मुंबई: मानखुर्द मंडाला येथील झोपडपट्टीला भीषण आग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन 

 मानखुर्दमधील मंडाला या ठिकाणी माया हॉटेलजवळ असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक दलाचे 16 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मानखुर्दमधल्या मंडाला येथील झोपडपट्टीतील एका गोदामाला सकाळी 6 वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. परंतु आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीत कोणत्याही जीवितहानीची घटना समोर आलेली नाही. अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.