मुंबईतील गरजूंना जेवणासाठी ‘कम्युनिटी फ्रीज’ ची संकल्पना

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन टीम – घरातील शिल्लक अन्न गरजूंच्या मुखात जावे यांसाठी मुंबई(Mumbai)तील नेव्हर एव्हर स्लीप हंग्री (Never Ever Sleep Hungry) या संस्थेने ‘मुंबईकर्स मोहब्बतखाना’ (Mumbaikars Mohabbatkhana) या उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्यासाठी संस्थेने उभारलेल्या ‘कम्युनिटी फ्रीज’(Community fridge) च्या साहाय्याने मदत करणार्‍यांना आणि स्वीकारणार्‍यांना एकाच ठिकाणी एकत्र आणण्याचे काम मुंबई (Mumbai )कर्स मोहब्बतखाना नी केले आहे.

मुंबईत उपाशीपोटी झोपणार्‍यांची संख्या मोठी आहे. अशा प्रत्येकाला जेवण मिळावे यासाठी ‘नेव्हर एव्हर स्लीप हंग्री’ या संस्थेने ‘मुंबईकर्स मोहब्बतखाना’ या संकल्पनेंतर्गत ‘कम्युनिटी फ्रीज’ ची व्यवस्था केली आहे. कम्युनिटी फ्रीज म्हणजे अशी शीतपेटी जिथे प्रत्येकजण आपल्या घरातील खाण्यायोग्य जेवण गरजूंसाठी ठेवू शकतो. तीन आठवडयांपूर्वी नागपाडा जंक्शन ( Nagpada Junction) येथील सारवी हॉटेल, त्यानंतर ठाणे आणि शनिवारी माटुंगा येथील रुईया महाविद्यालया(Ruia College) समोर डीपीज हॉटेलच्या बाहेर ही शीतपेटी ठेवण्यात आली.

‘गेल्या तीन दिवसांत माटुंग्यातील बर्‍याच लोकांनी यात खाद्यपदार्थ ठेवले. आम्हीही हॉटेलमधील उर्वरित जेवण याच शीतपेटीत ठेवतो. दिवसभरात गरजू येतच असतात परंतु रात्रीच्या जेवणावेळी अधिक गर्दी होते,’ असे डीपीज हॉटेलचे व्यवस्थापक यांनी सांगितले. ‘हा उपक्रम केवळ तीन ठिकाणी सुरू करून आम्हाला थांबायचे नाही. इथे कुणीही उपाशीपोटी झोपता कामा नये यासाठी मुंबईभर ही चळवळ म्हणून उभी करण्याचा आमचा मानस आहे. तेवढया संख्येने शीतपेटी पुरवण्याची तयारीही आहे,’ असे नेव्हर एव्हर स्लीप हंग्री या संस्थेचे विश्वस्त आसिफ पोरबंदरवाला यांनी सांगितले.