मोटारसायकली चोरणारे अल्पवयीन मुले ताब्यात

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

महागड्या गाड्यांचा शाैक पूर्ण करण्यासाठी गाड्यांची चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलांना अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून दोन दुचाकी वाहनासंह दोन महागड्या सायकली असा एकूण 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मागील काही दिवसापूर्वी अलंकार पोलीस स्टेशनच्या परिसरातून दोन गाड्या व दोन सायकली चोरी गेल्याची घटना घडली होती. यामुळे पोलीस घटनेवर पाळत ठेऊन होते. खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार दोन मुले कमिन्स कंपनीसमोर संशयितरित्या फिरत असल्याचे दिसल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी वाहन आणि साकयल चोरीचे गुन्हे कबूल केले. तसेच त्यांच्याकडून आणखी तीन गुन्ह्याची माहिती मिळाली आहे.

सदरची करवाई दक्षिण प्रादेशीक विभागाचे अपर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर,परिमंडल -1 चे पोलीस उपायुक्त बसवराज तेली,डेक्कन विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव मोहीते, यांच्या मार्गदर्शनाखाली अलंकार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे, पोलीस निरीक्षक( गुन्हे ) विजयकुमार शिंदे, पोलीस उप-निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस उप- निरीक्षक गणेश माने,पोलीस नाईक प्रमोद मोहिते, नवनाथ शिंदे, किरण नेवसे यांनी केली.