…म्हणून रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्पष्टीकरण द्यावे : मुख्यमंत्री नितीश कुमार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रशांत किशोर ज्यांची ओळख आहे रणनीतीकार, ज्यांनी 2014 मध्ये मोदी कँपेन करत मोदींना सत्तेत आणले. परंतू त्यांची दुसरी ओळख आहे ती म्हणजे ते नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल यूनायटेडचे उपाध्यक्ष आहेत. परंतू प्रशांत किशोर ममता बॅनर्जींसाठी रणनीतीकार म्हणून काम करणार असल्याने बराच वाद निर्माण झाला आहे.

त्यामुळे आता नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना खडेबोल सुनावत त्यांना रविवारी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत या प्रकरणी स्वत:च येऊन स्पष्टीकरण द्यावे असे सांगितले आहे. त्याच्या इतर पक्षांसाठी काम करण्याच्या पद्धतीमुळे माध्यमामध्ये भ्रम निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रशांत किशोर यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी नितीश कुमार यांनी केली आहे. नितीश यांनी असे देखील स्पष्ट केले की, प्रशांत किशोर यांनी पक्षाने जी जबाबदारी दिली आहेत त्याला ते उत्तमरित्या पार पाडत आहेत.

नितीश कुमार यांनी सांगितले की, प्रशांत किशोर रविवारी आयोजित बैठकीत स्पष्टीकरण देतील. प्रशांत किशोर हे निवडणूक कँपेनसाठी रणनीती आखतात . त्यांची कंपनी हे काम करते. त्या बरोबरच नितीश यांनी सांगितले की हे सत्य आहे की प्रशांत हे जेडीयू सदस्य आहेत, परंतू ते वेगवेगळ्या नेत्यासाठी काम करतात. आता पार पडलेल्या आंध्रप्रदेशच्या निवडणूकीत देखील त्यांनी काम पाहिले होते. नितीश यांनी पक्षाची बाजू मांडत सांगितले की, पक्षाला त्याच्या कामाशी कोणतेही कारण नाही. यावेळी नितीश यांनी विधानसभेबाबत देखील भाष्य केले आहे. येणाऱ्या विधानसभेसाठी जेडीयू आणि भाजप मिळून काम करणार आहे.