‘या’ अभिनेत्रीने केला भाजपात प्रवेश

हैदराबाद वृत्तसंस्था

अभिनेते तसेच अभिनेत्र्या यांचा राजकारणात प्रवेश आता नवा राहिलेला नाही. यातच आता प्रसिद्ध अभिनेत्री माधवी लताने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लता यांचे पक्षात स्वागत केले.

शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशअध्यक्ष लक्ष्मण, वरिष्ठ नेता बंडारू दत्तात्रेय यांच्या उपस्थितीत माधवीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माधवी लता म्हणाली की, मी पक्षाला आणखी बळकटी देण्याचा प्रयत्न करेल. काही दिवसांपूर्वीच माधवी लता हिने पवन कल्याण यांचा राजकीय पक्ष जनसेनेचा प्रचार करणार असल्याचे म्हटले होते.