येरवड्यात तरुणाचा खून

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन
येरवडा येथील कॉमर्स झोनच्या मैदानावर एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खुन करण्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. नितीन कडाळे (वय २५, रा़ पंचशीलनगर, येरवडा) असे या तरुणाचे नाव आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.
येरवडा येथील कॉमर्स झोन जवळील मैदानात आज सकाळी काही जण फिरायला गेले होते त्यावेळी त्यांना तेथे एक मृतदेह पडल्याचे आढळून आले त्यांनी ही माहिती येरवडा पोलिसांना दिली.

त्यानंतर तातडीने येरवडा पोलीस, गुन्हे शाखा तपास पथक, न्यायवैद्यक पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनीही घटनास्थळाला भेट दिली. नितीन व त्याचे मित्र काल रात्री बाहेर गेले होते त्यानंतर त्याचा संपर्क झाला नाही़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, मयत तरुणाची ओळख पटली असून या गुन्ह्यातील आरोपीही निष्पन्न होत आहेत. संबंधित व्यक्तीच्या घराच्यांना या घटनेची माहिती मिळाली आहे. नितीनच्या भावाची फिर्याद दिली आहे.