योगेश कन्सट्रक्शनवर वीस लाखांच्या फसवणूकीप्रकरणी गुन्हा दाखल

पुणेः आॅनलाईन पोलीसनामा
फ्लॅट खरेदीचे पैसे वेळेत घेऊनही फ्लॅटचा ताबा न दिल्याने योगेश कन्सट्रक्शन विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात महाराष्ट्र मालकी फ्लॅट्स कायदा 1963 कलम 4,10,11,13 व 14 प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जस्मिन कोर बक्षी, (वय-30, व्यवसाय-मुलुंड पूर्व, मुंबई ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरेश घंगाळे आणि योगेश कन्स्ट्रक्शन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी या मुंबईच्या राहणार्‍या आहेत. त्यांनी वडगावशेरी येथील गौरी हाईटस येथे योगेश कन्सट्रक्शनच्या साईटमध्ये फ्लॅट घेतला. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी वीस लाख 51 हजार 560 रुपये दिले होते. मात्र त्यांना फ्लॅटचे रजिस्ट्रेशन विहित नमुन्यात करुन न देता, फ्लॅटचा ताबाही वेळेत दिला नसल्याने फसवणूक केल्याप्रकरणी सुरेश घंगाळे आणि योगेश कन्सट्रक्शन विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.