रणजी संघाचे माजी कर्णधार राजेंद्र भालेकर अनंतात विलीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार राजेंद्र भालेकर यांचे दोन्ही किडन्या निकामी झाल्याने निधन झाले. शनिवारी रात्री ८ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून राजू भालेकर आजारी होते. त्यांच्यावर जहांगीर हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते . शनिवारी चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. ते सध्या रणजीच्या महाराष्ट्र संघाच्या निवडी समितीचे सदस्य म्हणून काम पाहत होते.

याव्यतिरिक्त पीवायसी हिंदू जिमखानाच्या क्रिकेट विभागाचे ५ वर्ष सचिव म्हणून ते कार्यरत होते. राजू भालेराव यांनी आपल्या रणजी सामन्यांच्या कारकीर्दीत 74 सामन्यांमधून तब्बल 3877 धावा केल्या. त्यामध्ये 18 वेळा अर्धशतक तर 7 शतके आहेत. नाबाद 207 धावांचा उच्चांक त्यांच्या नावावर आहे.