राज्यात उन्हाचा पारा वाढला, उष्माघातापासून सावधान

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

येत्या ४८ तासात मुंबई, पुणे आणि नाशिक या तीन प्रमुख शहरांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रविवार या दिवसाची मुंबईमधील सर्वात उष्ण दिवस नोंद झाली . रविवारी मुंबईत पारा तब्बल ४१ अंशावर होता. यापुर्वी २०११ मध्ये १७ मार्चला मुंबईचे तापमान ४१.३ अंशावर पोहचले होते. तसेच सोमवारीही उन्हाच्या झळांनी मुंबईकरांना चांगलेच हैराण केले.

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत सोमवारीही पारा ४० अंशांच्या वर होता. मुंबई नाशिक आणि पुणे या तिन्ही शहरांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे मार्च महिना संपतानाच लोकांना उन्हाच्या झळा बसत आहेत.

उष्माघातापासून बचावासाठी अशी घ्या काळजीः

हे करु नकाः
दुपारी 12 ते 3 या कालावधीत उन्हात फिरू नका.
मद्यसेवन, चहा, काॅफी व कार्बाेनेट साॅफ्ट ड्रींक्स घेऊ नका.
उच्च प्रथिनेयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.
पार्किंग केलेल्या वाहनामध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यानां सोडू नका.

बचावासाठी हे कराः

तहान नसल्यास ही पुरेसे पाणी घ्या.
साैम्य रंगाचे, सेैल, आणि काॅटनचे कपडे वापरा.
बाहेर पडताना गाॅगल्स, छत्री, टोपी, बुट किंवा चप्पल वापरा.
प्रवास करताना सोबत पाणी घ्या.
आपले घर थंड ठेवा, पडदे, झडपा, सनशेड बसवा तसेच रात्री घराच्या खिडक्या उघड्या ठेवा.
उन्हात डोक्यावर छत्री, टोपीचा वापर करा, डोके, गळा, चेहऱ्यासाठी अोल्या कपड्याचा वापर करा.
अशक्त, कमजोरी असेल तर त्वरीत डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
अोआरएस, घरची लस्सी, तोरणी,लिंबू पाणी, ताक इत्यादी घ्या.
जनावरांना सावलीत ठेवा व पुरेसे पाणी द्या .
फॅनचा वापर करा, गरम पाण्याने आंघोळ करा.