रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन प्रकाश मेहता यांची उचलबांगडी

रायगड: रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. नवे पालकमंत्री म्हणून अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र जव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. प्रकाश मेहता यांच्यावर रायगड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते नाराज होते. या नाराजीमुळेच मेहतांची उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांबरोबरच रायगडवासीय सुद्धा प्रकाश मेहता यावरून नाराज होते. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, पालकमंत्री म्हणून अशा महत्वाच्या कार्यक्रमांना मेहता यांनी उपस्थिती न दर्शवता दांडी मारली. सावित्री नदी दुर्घटनेवेळीही मेहता यांना पालकमंत्रिपदावरुन हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता.