राष्ट्रवादीचे हल्लाबोल नव्हे मनोरंजनाचा ऑर्केस्ट्रा :आमदार लक्षण जगताप

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन
भोसरी आणि काळेवाडी येथे राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलनाच्या मोठ्या सभा झाल्या आहेत.यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे,धनंजय मुंडे,दिलीप वळसे पाटील,यासारखे दिगगज नेते या सभेत उपस्थित होते. मात्र हे हल्लाबोल आंदोलन केवळ ऑर्केस्ट्रा असून मनोरंजनाचे होत असल्याची टीका आमदार लक्षण जगताप यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप,आमदार महेश लांडगे,महापौर नितीन काळजे,पक्ष नेते एकनाथ पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

हल्लाबोल आंदोलनातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी इव्हेंट मॅनेजमेंट कार्यक्रम राबवून जनतेचा भ्रम निराश केला आहे.केवळ टीका करून जनतेचा विश्वास संपादन करता येत नसतो,अस आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले.त्यामुळे राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन हे केवळ मनोरंजनाचा ऑर्केस्ट्रा होता असा टोला आमदार लक्ष्मण जगताप यांनी लगावला आहे.इतरांवर टीका करण्यापेक्षा आपले हात किती भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत ते पाहावे. त्यानंतर इतरांवर टीका करावी अस देखील जगताप म्हणाले.

”पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला मी विश्वास देतो की,शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या प्रश्न मार्गी लावला आहे.त्या पद्धतीने शास्तीकर,अनधिकृत बांधकाम,कचऱ्याची समस्या,निगडीपर्यंत मेट्रो यासह अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास प्रयत्न करणार असल्याचे म्हणाले. जनतेचे प्रश्न केवळ हल्लाबोल सारखे आंदोलन करून सुटत नाहीत. प्रत्यक्षात जनतेत राहून काम केल्यावरच सुटतात,” असे आमदार लक्षण जगताप म्हणाले.